पारगड / सी. एल. वृत्तसेवा
नेत्रदान चळवळ संचलित अंधाचे रोजगार केंद्र मार्फत कान्होबा माळवे यांच्या कडून चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड, मिरवेल आणि नामखोल गावात लाईट माळेचे घरोघरी वाटप
गडहिंग्लज, चंदगड व आजरा या तिन्ही तालुक्यामध्ये अंधाच्या जीवनात प्रकाश आणणारी " मरणोत्तर नेत्रदान चळवळ " गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. अंध बांधवाना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठीचे बळ देणे या उद्देशातून गेल्या वर्षभरापासून " दिपस्तंभ " या माध्यमातून "अंधाचे रोजगार केंद्र" गडहिंग्लज येथे सुरु करणेत आले. येथे गुणवत्ता पूर्ण LED बल्ब, माळा इत्यादी बनविल्या जातात. या केंद्रांमध्ये अंध बंधू-भगिनी स्वाभिमानाने व समाधानाने काम करीत आहेत. त्यांच्या या स्वाभिमान जागविणार्या कार्यामध्ये थोडाफार लागावा या प्रामाणिक उद्देश्याने कान्होबा माळवे यांनी काही LED माळा खरेदी केल्या व त्यांनी पारगड, मिरवेल व नामखोल गावातील प्रत्येक घराला एक माळ भेट म्हणून दिली आहे. ही माळ येणाऱ्या गणेशोत्सव, दसरा व दीपावली या उत्सववा मध्ये घराला तोरण म्हणून लावून अंध बांधवाच्या स्वाभिमानाचा आदर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment