चंदगड तालुक्यातील सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजेश पाटील यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2024

चंदगड तालुक्यातील सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजेश पाटील यांची भेट

भेटीनंतरविविध समस्यावर आमदार राजेश पाटील यांच्याशी चर्चा करताना सरपंच परिषदेचे पदाधिकारी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चंदगडच्या पदाधिकारी यांनी घेतली आमदार राजेश पाटील यांची भेट. या भेटीमध्ये सरपंच परिषदेच्या चंदगड कार्यकारिणीने तालुक्यातील सरपंच व जनतेच्या विविध समस्यावर आमदार राजेश पाटील साहेबांशी चर्चा केली.

     यावेळी प्रथम तालुक्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या परिषदेचे कार्याध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर जल जीवन मिशन कामांच्या तक्रारीबाबत जे. एम. पोर्टल साहित्य खरेदी मधील अडचणी,  चंदगड डेपो मध्ये कमी असलेल्या लालपरी बस व वाहक चालक, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायती कडील  ग्रामसेवक कमी असल्या जागा तात्काळ भरणे बाबत, बेळगाव वेंगुर्ले रस्ता तात्काळ दुरुस्ती करणे बाबत, नॅशनल बँकेतील ग्राहकांच्या गैरसोय बाबत, आरोग्याच्या दृष्टिकोनातून चंदगड तालुक्यात तात्काळ डायलिसिस सेंटर सुरू करणे बाबत व इतर विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

        यावर आमदार राजेश पाटील यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांशी तात्काळ फोनवर चर्चा करून हे प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्याविषयी खडे बोल सुनावले. जल जीवन संदर्भात येत्या पंधरा दिवसाच्या आत सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांचे सोबत मीटिंग आयोजित करण्याचे आदेश दिले. चर्चेमध्ये सरपंच परिषदेचे अध्यक्ष आर. जी. पाटील यांनी सविस्तर विषय मांडले. तसेच तसेच सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक मनोहर कांबळे, महादेव पाटील, आनंद कांबळे, ज्योतिबा आपके, सुभाना गावडे व इतर पदाधिकारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. आभार सरपंच परिषदेचे खजिनदार राजेंद्र कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment