राजगोळी खुर्द हायस्कूल मध्ये पारगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ सायकली प्रदान करण्यात आल्या. |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द शाळेने शाळेची वेळ ११ ते ५ ऐवजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत केली आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या झालेल्या बैठकीत हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. अशी माहिती मुख्याध्यापक पी. बी. कवठेकर यांनी दिली.
या क्रांतिकारी निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यासाठी श्री आदर्श शिक्षण संस्था कोथळी चे सर्व पदाधिकारी व राजगोळी ग्रामस्थांचे प्रोत्साहन लाभले. शाळेची वेळ ८ ते ५ करणारे चंदगड तालुक्यातील हे बहुधा पहिलेच विद्यालय असावे. त्याबद्दल शैक्षणिक संकुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदा मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावलेल्या या शाळेतील उपक्रमांसाठी अनेक देणगीदार पुढे येत आहेत. अशा देणगीदारांच्या मदतीतून क्रांती दिनानिमित्त परगावावरून रोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना १३ सायकली प्रदान करण्यात आल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, गावातील आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राघवेंद्र इनामदार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment