उपोषणास बसलेल्या बाळासाहेब हळदणकर यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तिसऱ्या दिवशी आलेल्या महिला
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गडहिंग्लज मध्ये केली जाते. त्याऐवजी ती चंदगड मध्येच झाली पाहिजे या मागणीसाठी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांनी तहसीलदार कार्यालय चंदगड समोर सुरू असलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
विधानसभा निवडणुकी वेळी इतर प्रक्रिया चंदगड मधून होतात. त्यासाठी इथे सर्व सुविधा असूनही गडहिंग्लजला होणारी मतमोजणी चंदगड मधेच करावी. यासाठी ४ जुलै व १९ जुलै रोजी निवेदनाद्वारे करून याबाबतचा आदेश प्रशासन व निवडणूक आयोगाने १४ ऑगस्ट पूर्वी न काढल्यास तहसील कार्यालय चंदगड समोर १५ ऑगस्ट २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा हळदणकर तहसीलदार चंदगड यांना निवेदनाद्वारे दिला होता.
प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली न झाल्याने त्यांनी १५ ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे गेल्या तीन दिवसात अनेक राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. आज तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळे मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.
पहिल्या व दुसऱ्या दिवसानंतर आज तिसऱ्या दिवशीही तहसीलदार राजेश चव्हाण यांनी निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्यासह भेट देऊन हळदणकर यांच्याशी चर्चा केली.
No comments:
Post a Comment