गवसे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्षपदी पुजा गिरी - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2024

गवसे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष पाटील, उपाध्यक्षपदी पुजा गिरी



संतोष तुकाराम पाटील



सौ. पूजा सुनील गिरी










चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      गवसे (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर गवसे शाळा कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी संतोष तुकाराम पाटील व उपअध्यक्षपदी सौ. पूजा सुनील गिरी यांची निवड करण्यात आली. 

    यावेळी सदस्य सागर पेडणेकर, प्रकाश बुरुड, अनिल नांडवडेकर, भक्ती गुरव, नम्रता सुतार, माधुरी गुरव, सुहाना साळगावकर, मेघा कांबळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी रवी साबळे यांनी प्रास्ताविक केले व मुख्याध्यापक श्री. माईंनकर यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. 

No comments:

Post a Comment