कोदाळी येथे वृक्षोरोपन करताना मान्यवर.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोदाळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात वनविभाग कोल्हापूर अंतर्गत पाटणे येथील शाखेने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून वेगवेगळ्या प्रकारच्या जंगली तसेच औषधी वनस्पतीची झाडे शाळेचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षकांच्या हस्ते लावली.
या वेळी विद्यार्थ्यांना वृक्ष आपले खरे मित्र आहेत या विषयी वनविभाग पाटणे शाखेचे नागविकर साहेबांनी तसेच खोराटे साहेबांनी माहिती दिली. तसेच अलका लोखंडे यांनी वृक्ष लागवड का करावी व त्याची जोपासना कशी करावी या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्व वनविभाग स्टाफचे स्वागत व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष दळवी, उपाध्यक्ष निलेश गावडे, सदस्य नारायण कांबळे, सदस्या सौ. प्रतीक्षा गावडे व सौ. रोहिणी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाजंत्री यांनी केले तर आभार सागरिका कुटे यांनी मानले.
No comments:
Post a Comment