पुन्नाप्पा नागोजी पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कडलगे (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक पुन्नाप्पा नागोजी पाटील (नाना गावडे) वय ८७ यांचे शनिवार दि १०/८/२०२४ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पंचक्रोशीत अण्णा म्हणूनच परिचित असलेल्या पी एन पाटील यांनी ग्रामसेवक म्हणून आपली सेवा ढोलगरवाडी, कडलगे, सुंडी, करेकुंडी, महिपाळगड, निट्टूर, कोवाड तसेच गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी- हलकर्णी येथे बजावली. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी प्रामाणिकपणे बजावले. मनमिळाऊ स्वभाव व कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व नागरिकांबरोबर अगत्यपूर्वक वर्तणूक यामुळे ते सेवा केलेल्या प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या आदरास पात्र ठरले होते.
No comments:
Post a Comment