कोल्हापुर / सी एल वृतसेवा
कोल्हापुरात नव्याने सुरू होणाऱ्या "महाराष्ट्र दिनमान" या वृत्तपत्रासह वेबसाईट व युट्युब चॅनेल चा शुभारंभ शरदचंद्र पवार यांच्या हस्ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता गोविंदराव टेंबे नाटयगृह, गायन समाज देवल क्लब, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ कोल्हपूर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज असतील.
कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मुंबई भाजप आणि खजिनदार बीसीसीआय अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीसह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, प्रकाश आवाडे, संजय मंडलिक, मानसिंग नाईक, जयंत आसगावकर, विनय कोरे, व्ही. बी. पाटील, संजय पवार, श्रीमती जयश्री जाधव व समरजीत सिंग घाटगे उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे व विजिगीषा मीडियाचे संचालक अजिंक्य चोरमारे यांनी केले आहे.
संपत पाटील (चंदगड तालुका प्रतिनिधी)
No comments:
Post a Comment