धुमडेवाडीत रंगला 'खेळ पैठणीचा', कोण ठरल्या पैठणीच्या मानकरी....! - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2024

धुमडेवाडीत रंगला 'खेळ पैठणीचा', कोण ठरल्या पैठणीच्या मानकरी....!

 

धुमडेवाडीत रंगला 'खेळ पैठणीचा', कोण ठरल्या पैठणीच्या मानकरी....!

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      गौरी गणपती उत्सवा निमित्त सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील यांनी आयोजित केलेल्या 'सन्मान नारीचा' हा होम मिनिस्टर' कार्यक्रम धुमडेवाडी येथे उत्साहात पार पडला. प्रास्ताविक सौ गंगा गोकाकर यांनी केले.  यामध्ये खेळ पैठणीचा या उपक्रमात महिलांनी उर्त्स्फुत सहभाग घेतला.

         सौ. नेहा गोविंद पाटील यांनी मानाची पैठणी  पटकावली. श्री गणराया हे स्त्री शक्तीला मानाचे स्थान देणारी देवता आहे. महिला या बुद्धीमत्ता व कर्तृत्वाने कुठे ही कमी नसून त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही समाजिक जबाबदारी आहे. असे प्रतिपादन प्राध्यापक संजय साबळे यांनी केले. साबळे आणि आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे, उखाणे, तळ्यात मळ्यात, झिम्मा फुगडी, संगीत खुर्ची यासारख्या खेळातून आनंदमय वातावरण तयार केले. प्रत्येक खेळातील विजयी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये स्नेहल पाटील, अस्मिता पाटील, शोभा पाटील, पूजा बागडी, विद्या पाटील, यमूना पाटील या महिलांनी यश मिळविले.

  यावेळी जानबा पाटील, कृष्णा पाटील, यल्लाप्पा पाटील, शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विद्या पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment