गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील हलकर्णी जि. प. मतदार संघातील नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोड साखर संचालक विद्याधर गुरबे होते.
स्वागत सरपंच भारती रायमाने यांनी केले. 640 बांधकाम कामगार लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. चंदगड विधान सभा मतदार संघातील काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील यांनी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध सवलती व योजनांची माहिती दिली. पूर्व भागातील काँग्रेस संघटक सुनील भुईंबर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास गडहिंग्लज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत देसाई, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष रामदास पाटील, रावसाहेब पाटील, नागराज जाधव, सुभाष पाटोळे, रमेश पाटील, रामगोंडा जिनानावर, आनंद नांगनुरे, उत्तम मनीकेरी, प्रकाश जाधव यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी आरपी रेखा मनिकेरी व पूनम थोरात यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment