कै. केदारी रेडेकर रुग्णालयाला ५० बेडशिट देणगी देताना संदिप चौरे सोबत अनिरुद्ध रेडेकर व मान्यवर
तेऊरवाडी / सी. एल वृत्तसेवा
विंझणे (ता. चंदगड) येथील कृष्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप आप्पासाहेब चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त, कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज यांना ५० बेडशीटची देणगी देण्यात आली. या सामाजिक उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य आणि स्थानिक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी रुग्णालयाचे अध्यक्ष श्रीमती अंजना केदारी रेडेकर, सचिव अनिरुद्ध केदारी रेडेकर आणि कृष्णा प्रतिष्ठानचे संस्थापक आप्पासाहेब चौरे, विंझणेचे सरपंच तानाजी पवार, उपसरपंच शामराव बागवे, हरी जाधव, (सदस्य) 'रामचंद्र गंगाराम घोळसे, (सेवा सोसायटी चेअरमन), राजाराम अर्जुन जाधव (अध्यक्ष तंटामुक्ती), लक्ष्मण निकम (पोलीस पाटील) आदि मान्यवर व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. बेडशिट दिल्या बद्दल संदीप आप्पासाहेब चौरे यांचे रुग्णालयाच्या वतीने आभार मानले.
No comments:
Post a Comment