कोवाड मर्चंट पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस ज्येष्ठ संचालक वीरुपाक्ष गणाचारी यांनी फोटो पूजन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व हितचिंतक
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील दि कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन दयानंद मोटुरे होते.
स्वागत व्हा चेअरमन उत्तम मुळीक यांनी केले. प्रास्ताविकात चेअरमन मोटुरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सध्या संस्थेचे सभासद ९३७ असून एकूण भांडवल रु. ५२,६३,३३० एवढे आहे. एकूण ठेवी रु. ६ कोटी ३५ लाख ४३ हजार ९६० तर ४,९४,५६४२५रु. ची कर्जे वाटप केली आहेत. संस्थेची एकूण उलाढाल ९,०७,१६,१०९ एवढी असून संस्थेला अहवाल सालात २० लाख ०१ हजार ६२२ रुपये नफा झाल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रगतीत संस्था कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे चेअरमन यांनी आवर्जून सांगितले. संस्थेने सभासदांना १५ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेतला आहे. वर्षीपासून सभासदांनी घेतलेल्या ५ लाखापर्यंतच्या कर्जासाठी विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यापोटी १,६७,४०७ रु विम्यासाठी भरली आहे. संस्था यंदा २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्यामुळे वर्षभरात संस्थेची स्व मालकीची इमारत दुरुस्ती व रंगरंगोटीसह विविध उपक्रम राबवण्याचे ठरले. यावेळी सभासदांच्या दहावी बारावी गुणवत्ताधारक विद्यार्थी व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुलांना गौरवण्यात आले. यावेळी संचालक बी के पाटील, बाळासाहेब वांद्रे, विरूपाक्ष गणाचारी, कल्लाप्पा वांद्रे, विष्णू गावडे, राणबा तोगले, शाकीर काझी, कृष्णा कांबळे, रवी पाटील, मनीषा पाटील सदस्य हजर होते. यावेळी झालेल्या चर्चेत श्रीधर भोगण, वसंत पाटील, शिवाजी तेली आदींनी भाग घेतला. मॅनेजर पुंडलिक पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment