सातवणेत लोटला भक्तांचा महापूर, साळगावच्या १०५ वर्षे वयाच्या आजोबानी घेतले गणरायांचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2024

सातवणेत लोटला भक्तांचा महापूर, साळगावच्या १०५ वर्षे वयाच्या आजोबानी घेतले गणरायांचे दर्शन

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

       सातवणे (ता. चंदगड) येथे गेल्या दोन दिवसा पासून  लाखो भाविकांनी गणेश मूर्ती सह देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. काल रात्री तर भक्तांचा जनसागर लोटला. संपूर्ण गाव  गणेश भक्ताने फुलून गेलं. देखावे पाहण्यासाठी बेळगाव, खानापूर, निपाणी आदी कर्नाटकातीलही  गणेश भक्तानी गर्दी केली असतानाच आजरा तालूक्यातील साळगाव येथील वयोवृद्ध गणेश भक्त धोंडीबा रामा गावडे वय १०५ वर्षे  यानीही आज गणेश दर्शनाचा लाभ घेतला. शंभरी पार करूनही गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी सातवणे मध्ये आलेल्या  व बाप्पांविषयी असणारी श्रद्धा तसेच त्यांच्या अंगी असणारी ऊर्जा पाहून तरुण वर्ग ही चकित झाला.

        काल दुपारपासून येथे प्रचंड भाविकांची गर्दी होती.  ती रात्री पहाटे चार वाजे पर्यंत भाविक दर्शन घेत होते. हालते देखावे पाहून भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलन येत होता तर गर्दी पाहून गावातील लोकांचा आनंद  द्विगुणित होत आहे. शंभरी पार केलेल्या धोंडिबा गावडे या गणेशभक्ता ला पाहन  अष्टविनायक मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते  पांडुरंग भडगावकरांना आनंद अश्रू  आले. या आजोबांचं फुल देऊन पांडरंग भडगावकर यानी स्वागत केले. या गर्दीच्या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार  होऊ नये. यासाठी  ग्रामपंचायत सरपंच  उपसरपंच सदस्य चंदगड पोलीस ठाण्यामार्फत पुरवलेले होमगार्ड यांच्यामार्फत सेवा पुरवण्यात  येत आहे.

No comments:

Post a Comment