तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुकास्तरीय शासकीय बुद्धिबळ स्पर्धेतील श्री शिवशक्ती हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
17 वर्ष वयोगट बुद्धीबळ स्पर्धेमध्ये कुमारी तेजस्विनी ईश्वर गावडे हिने प्रथम क्रमांक व सलोनी शिवाजी चव्हाण हीने तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या व मुलांच्या हाॅलीबाॅल स्पर्धेत या दोन्ही संघानी द्वितीय क्रमांक पटकवला. या सर्वाना नवमहाराष्ट शिक्षण मंडळ माणगांव संस्थेचे सचिव आमदार राजेश पाटील, मुख्याध्यापक व्ही. एन. सुर्यवंशी क्रीडा शिक्षक आय. वाय. गावडे, ए. के. निर्मळकर, श्री. हिशेबकर तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment