मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जयवंत पाटील व सौ मनीषा जयवंत पाटील
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवासी व मराठी विद्यामंदिर हाजगोळी, ता चंदगड चे मुख्याध्यापक जयवंत लक्ष्मण पाटील यांना इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर यांचा जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी दिलेले योगदान, राबविलेले विविध उपक्रम, शाळा बांधकाम, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा पातळीपर्यंत यश मिळविण्यासाठी केलेले मार्गदर्शन, भरीव शैक्षणिक उठावातून शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. इत्यादी कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट डॉ मनिषा चव्हाण, व्हा. प्रेसिडेंट उत्कर्षा पाटील, सेक्रेटरी सौ.ज्योती तेंडोलकर आदींच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्या डॉ. अनुराधा सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment