डॉ. चेतन नरके मार्गदर्शन करताना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
संपूर्ण चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे गोकुळ वर अनंत उपकार असून चंदगड तालुक्यातील गुणवत्तापूर्ण दुधामुळेच गोकुळचा दर्जा वाढल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक, कृषी व सहकार क्षेत्रातील तज्ञ, डॉ. चेतन नरके यांनी केले. ते चंदगड महाविद्यालयात कॉमर्स विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्चासत्रात सहकारातून समृद्धी आणि देश विदेशातील रोजगाराच्या संधी या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते.
डॉ. चेतन नरके पुढे म्हणाले की, ``चंदगड तालुका हा माझा आवडता तालुका आहे. या तालुक्यातील तरुण अतिशय कष्टाळू, व प्रामाणिक आहेत. उद्योगांमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून कॉलेज जीवनामध्येच झोकून देऊन करिअर घडवणे गरजेचे आहे, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हवे त्या क्षेत्रात झेप घेता येते, त्यासाठी कष्टाची व परिश्रमाची तयारी असावी, वेळ वाया न घालवता, विद्यार्थ्यांनी करिअर साठी झगडले पाहिजेत, सहकारातील अनेक उच्च संस्थांमध्ये, विशेष पारंगत तरुणांची गरज असते, त्यासाठी काही कंपन्या गुणवंत तरुणांच्या शोधात असतात . त्यासाठी आपण तत्पर असले पाहिजेत, कॉलेजच्या वयात तरुण आणि प्रेमाचा विचार न करता आपल्या भविष्याचा व स्थिरतेचा विचार करायला हवा असे सांगून त्यांनी आपल्या जडणघडणीतील विविध किसे सांगून विद्यार्थ्यांच्या करिअर व शिक्षण विषयक विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.``
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले की, खेड्यापाड्यातील दुर्गम, वाडीवस्तीवरील, वंचित व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या कॉलेजला मान्यता व मंजुरी दिली आहे. याचा लाभ घेणाऱ्या मुलींची उपस्थिती पाहून समाधान वाटते, आमदारकीच्या कालावधीमध्ये, अतिशय प्रभावीपणे काम केल्याने हा तालुका हरितक्रांतीमय झाल्याचे त्यांनी सांगून चुयेकर व नरके साहेबांनी गोकुळचा विस्तार व प्रगती केल्याचे सांगून ऋण व्यक्त केले.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. टी. ए.कांबळे यांनी केले. यावेळी डॉ. चेतन नरके व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे सचिव प्रा. आर.पी. पाटील यांनी खेडूत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन नरके साहेबांचे व भरमू अण्णांचे आभार मानले.
अध्यक्ष भाषणात डॉ. गोरल यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी केले, तर आभार प्रा. व्ही. के. गावडे यांनी मानले
या कार्यक्रमाला, माजी कृषी सभापती तुकाराम बेनके, माजी प्राचार्य डॉ. पी.आर.पाटील,, प्रा, एस, के.सावंत,एस. व्ही. गुरबे,प्रा.टी एम पाटील, पांडुरंग काणेकर, प्रा ए वाय जाधव, डॉ. एस एन. पाटील, डॉ. जी.वाय. कांबळे, प्रा एस एम पाटील डॉ एस. डी.गावडे ,श्रीनिवास पाटील, नंदकुमार चांदेकर, डॉ. कमलाकर, यांच्यासह बहुसंख्य तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment