गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
जरळी (ता. गडहिंग्लज) येथील नुकसानग्रस्त शेतकरी आणाप्पा माद्याळे आणि सौ. लक्ष्मी माद्याळे यांना अनिरुद्ध रेडेकर यांच्याकडून म्हैस प्रदान करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी जरळी येथील सौ. लक्ष्मी आण्णाप्पा माद्याळे यांचा गोठा जळून खाक झाला होता. त्यात त्यांची ४ म्हैशी मृत्युमुखी पडल्या होत्या. ऐवढा मोठा दुखःचा डोंगर कोसळला असताना अनिरुद्ध रेडेकर यांनी केलेल्या मदतीमुळे म्हैस देऊन या गरीब शेतकऱ्याला दुखःतून बाहेर पडण्यास नक्कीच हातभार लागणार आहे. शेतकरी जगला पाहिजे हीच या मागची प्रामाणिक भावना असल्याचे अनिरुद्ध रेडेकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी उपस्थित जरळी सरपंच सागर पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, उपाध्यक्ष भीमगोंडा पाटील, विठ्ठल चौगुले, आप्पासाहेब रेडेकर, इंजिनिअर मल्लिकार्जुन कोरे, यल्लाप्पा धनगर, अविनाश कुलकर्णी, माजी सैनिक महादेव धनगर, संदीप माने, बाबु शिंत्रे, अजित बंदी, अनिल कुलकर्णी, बाळू चौगुले (खातेदार), अमर कांबळे, संदीप कांबळे, कलय्या स्वामी, अविनाश देसाई, सुनील देसाई, प्रज्वल देसाई, रोहन गुरव, अजित काजी, राजाराम फुंडे, हेब्बाळ उपसरपंच सुरज गवळी, निलजी ग्रा. सदस्य. अजय मजगी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment