तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कुडित्रे येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजची हॅटट्रिक - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2024

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत कुडित्रे येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजची हॅटट्रिक

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        १९ वर्षाखालील शालेय प्रकारात फुटबॉल स्पर्धेत श्रीराम ज्युनिअर कॉलेज, कुडित्रे या संघाने डी. सी. नरके कॉलेज च्या टीम वरती तीन शून्य ने मात करून विजयाची हॅटट्रिक केली व विजयाची आपली परंपरा कायम राखली सदर विद्यार्थ्यांना फूटबॉलसाठी कोच प्रा. आर. जी. इंगवले तसेच सर्व विजेत्या खेळाडूंना कॉलेजचे प्राचार्य ए. डी. कुलकर्णी  व उपप्राचार्य आर. डी. मोरे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. सांगरूळ शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व पंचक्रोशीतील सर्व क्रीडाप्रेमीकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment