चंदगड / प्रतिनिधी
अलबादेवी (ता. चंदगड) येथील स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने व सव्यसाची गुरुकुलम वेंगरुळ संचलित शिवकालीन शस्त्रकला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली.
प्रशिक्षक लखन जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन झाले. त्यानंतर गावातील महिला भगीनिंच्या हस्ते शस्त्रपूजा करण्यात आली.स्थानिक मुलांचे शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक झाले.यावेळी गडहिंग्लज येथील जय जिजाऊ शिवकालीन शस्त्रकला पथकाने देखील शस्त्रकला सादरीकरण केले.प्रशिक्षणार्थींनी अनुभव कथन केले. यावेळी लखन जाधव यांनी शस्त्र कलेविषयी मार्गदर्शन केले .
सूत्रसंचालन वैभव डांगे यांनी केले.या शिबिराचेआयोजन आणि यशस्वी नियोजन यासाठी दीपक भादवणकर (गणुचीवाडी) यांनी सहकार्य केले. केरूशेठ कोले यांनी देखील या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि सहकार्य केले. तर नारायण आण्णापा पाटील यांनी प्रशिक्षकांची, आचार्यांची निवास व्यवस्था केली. स्वराज्य मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment