वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर धडक कारवाई करताना नेसरी पोलीस ठाण्याचे पोलीस, अधिकारी |
नेसरी : एस के पाटील / सी एल वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिंग्लज) पोलिस स्टेशन मार्फत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन धारकांवर आज दि २३ रोजी दिवसभर धडक कारवाई केली.
वरीष्ठ कार्यलय व नेसरी पोलिस स्टेशनचे सपोनि आबा गाढवे यांचा सूचनेनुसार नेसरी पोलिसाकडून परिसरातील विविध मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची नाकाबंदी करून कारवाई केली. यामध्ये चंदगड रोड, कोवाड रोड, गडहिंग्लज व आजरा रोडचा समावेश आहे. यामध्ये वाहन परवाना नसने, गाडीची योग्य कागदपत्रे नसने, ट्रिपल सिट अशा वाहन चालकावर व वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. अशा सततच्या कारवाईने वाहनधारक त्रस्त असले तरी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अशी कारवाई होणे खूपच गरजेचे आहे. असे मत सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment