१६०० कोटींचा निधी खेचून आणणारा चंदगडचा पठ्ठ्या राजेश पाटील यांना पुन्हा संधी द्या दुप्पट निधी देतो...! उपमुख्यमंत्री अजित पवार - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2024

१६०० कोटींचा निधी खेचून आणणारा चंदगडचा पठ्ठ्या राजेश पाटील यांना पुन्हा संधी द्या दुप्पट निधी देतो...! उपमुख्यमंत्री अजित पवार

 


तेऊरवाडी / एस. के. पाटील

    महाराष्ट्रातला शेवटचा मतदार संघ म्हणजे चंदगड. या  मतदार संघात सहकार, शिक्षण आणि आरोग्य याचा सर्वांगीन विकास १६०० कोटी रुपये आणून आमदार राजेश  पाटील यानी पहिल्याच टर्ममध्ये  पूर्ण केला. या पठयाला पुन्हा संधी द्या मी ३२०० कोटी देतो. हा अजित पवारांचा शद्ब आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी व्यक्त केले. ते नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जनसंवाद यात्रेत बोलत होते. यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी चे प्रवक्ते खासदार सुनिल तटकरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, वर्षाला ४६ हजार कोटींचे बजेट ठरवले आहे. विरोधक उगाचच आरडाओरड करत आहेत. आम्हाला राज्य कसे चालवायचे याची चांगली माहिती आहे. मी सात वेळा निवडून आलेल काय गोट्या खेळायला आलो नाही. हे सरकार महिलांना 3 गॅस सिलिंडर मोफत, महिना १५०० रूपये देत आहे. विज बील माफ योजना चालू राहणार आहे. गाय दूध ७ रुपये अनुदान दिले आहे.

     काम करत असताना पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची माझ्या नशिबाने संधी दिली आहे . याचे रेकॉर्ड सध्या तरी कोणी मोडणार नाही. विरोधक संविधानासंदर्भात उगीचच शंका घेत आहेत .पण मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी माय का लाल संविधान बदलू शकणार नाही.

      कांदा व बासूमती तांदूळ निर्यात मूल्य हटवायला सांगितले आहेत याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. वेळेत कर्ज व वेळेत लाईट बील भरणारा कोल्हापूरचा शेतकरी राज्यात अग्रेसर आहे. या सरकारने बळीराजाला मोफत विज  देणार आहे. याचा लाभ  44 लाख शेतकऱ्यांना  झाला आहे . पुढच  बील झिरो येईन अन मागच बील भरायच नाही . हि विज माफी पुढील पाच वर्ष सतत  राहणार आहे . शेतीसाठी दिवसा विज देणार आहे .हत्ती , गवे यांच्या बंदोबस्तासाठी सुप्रीम कोर्टाचा मान राखत फॉरेस्ट विभागाशी व आमदार राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार आहे . आमदार राजेश पाटील या पठ्याने गेल्या तीन वर्षात  १६०० कोटींचा विकास निधी आणला . आमदार कसा असावा तर असा असावा  कधी चिडणार नाही चिडलो तर गप्प बसणार अन मग हळूच बोलणार अन बोलता बोलता सगळी कामे करून घेणार . आमदार राजेश पाटील याना पुन्हा संधी द्या 3200 कोटी देण्याचे वचन हा अजित पवार देत आहे . तसेच सरपंच , पोलिस पाटील, कोतवाल  यांचे मानधन वाढवले .  मला चंदगड करानी भरभररून  प्रेम दिले आहे. 

      होसूर , कागणी ,कोवाड , तेऊरवाडी  व नेसरी ग्रामस्थांनी  जे प्रेम दिले व आयुष्यात सर्वाधिक राख्या बाधल्या  गेल्या ते विसरू शकत नाही . हा मतदासंघ डोंगर दऱ्याचा आहे . पूर्वेला कर्नाटक तर पश्चिमेला कोकण  आहे .दोन्ही राज्यांचा मिलाप होऊन  .चंदगडी भाषा तयार झाली आहे . दांडग गुळमाट  म्हणता म्हणतामला पण चंदगडी बोली भाषेची गोडी लागली आहे . चंदगडला निसर्ग सौंदर्य भरभरून दिले आहे . येथीत पर्यटन विकासाला निधी देणार आहे . 29 तारखेला लाडक्या बहिणीच पुढचा हप्ता जमा होणार आहे .हि योजना बंद होऊ देणार नाही . विरोधकांच्या अपप्रचाराल बळी पडू नका . अर्थ खाते मजबूत आहे . विरोधकांच्या पोटामध्ये आहे ते ओठावर येत आहे ते आले तर या योजना बंद करतील . १५ नोव्हेंबरला साखर कारखाने चालू करा म्हणजे रिकव्हरी जादा मिळून दर जास्त मिळू शकतो .

आपल नानं खणखणीत आहे . जे करतो तेच बोलतो .  कोल्हापूरला मेडिकल कॉलेजसाठी  1 हजार कोटी  दिले. चंदगडला काजू बोर्ड दिला . काजूवरील 2 . 5 %GST कमी केली .ट्रॉमा केअर सेंटरला ३४ कोटी दिले आहे यातील २७ कोटींची वर्क ऑर्डर  निघाली आहे. उचंगी प्रकल्प निधी मंजूर करून तो पूर्णत्वास आमदार राजेश पाटील यानी नेला ताम्रपर्णी घटप्रभा  व हिरण्ये केशी नदितील गाळ  काढण्यासाठी निधी मंजूर केला आहे. सिमा भाग विघ्यार्थ्यासाठी तुडये येथे  महाविघालय मंजूरी , शिवाजी विद्या पिठ  उपकेंद्र शिनोळी येथे मंजूर करून य. सिमाभागातील विद्यार्थ्यां गैरसोय टाळली आहे.

        सुना बेळगाव लाडकी बहिण योजना लाभ दिला.  आमदार राजेश पाटील यांच्या सुचनेनुसार कर्नाटकातून महाराष्ट्रात विवाह करून आलेल्या लाडक्या बहिणीना सुद्धा लाभ मिळवून दिला .लेक लाडकी योजना , एक लखपती दिदी . नळ पाणी योजना अशा हजारो योजना आणून विकास साधला जात आहे. केंद्रात आमच्या विचाराच सरकार आहे म्हणून आम्हाला पुन्हा संधी द्या राजेश पाटील याना पुन्हा दुसऱ्या टर्मचा आमदार करा मी निधी देण्यास मागे हटणार नाही असे अजित पवार यानी स्पष्ट केले .

आमदार राजेश पाटील म्हणाले , चंदगड मतदार संघासाठी कोट्यावधींचा निधी देणाऱ्या अजित पवार यांना सदैव साथ देणार आहे . १६०० कोटींची विकास कामे केवळ अजित दादांकडे अर्थ खाते असल्याने शक्य झाले आहे . मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय्य असून शेवटच्या श्वासापर्यंत केवळ  मतदार संघाच विकास हाच माझा श्वास असणार आहे .

यावेळी खासदार सुनिल तटकरे यानी सुद्धा आमदार राजेश पाटील यांच्या पाठीशी सर्वानी मतांच्या स्वरूपात घडयाळ चिन्हावर मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी गडहिंग्लज , आजरा व चंदगड तालूक्यातील राष्ट्रवादीचे  पदाधिकारी  ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . स्वागत जयसिंग चव्हाण यानी केले .

No comments:

Post a Comment