नाचणी पिक स्पर्धेत सातवणेच्या बाळू भडगावकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2024

नाचणी पिक स्पर्धेत सातवणेच्या बाळू भडगावकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार

 

राज्यपालांच्या हस्ते उत्कृष्ट पीक स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सातवणे गावचे शेतकरी बाळू भडगावकर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी मुंबई येथे २९ सप्टेंबर रोजी पार पडला. यात सातवणे, ता चंदगड गावचे प्रगतशील  शेतकरी बाळू  लक्ष्मण भडगावकर यांनी सन २०२१-२२ या वर्षांमध्ये नाचणी पिकात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, दादा भुसे  व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

       शेतकऱ्यांनी आधुनिक प्रगतीची कास धरून नवनवीन शेती प्रयोग,  सेंद्रिय शेती करणे, कमी जागेत जास्त उत्पादन घेणे खूप महत्त्वाचे आहे. अशा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र शासन  गौरव करते. आपल्या प्रयोगशील शेतीतून चंदगड तालुक्याचे नाव राज्यस्तरांपर्यंत पोहोचवणाऱ्या साठवणे येथील भडगावकर कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment