उत्पादकांसाठी खुषखबर : काजू बी अनुदानासाठी अर्ज भरण्याला पुन्हा मुदतवाढ – डॉ. परशराम पाटील यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2024

उत्पादकांसाठी खुषखबर : काजू बी अनुदानासाठी अर्ज भरण्याला पुन्हा मुदतवाढ – डॉ. परशराम पाटील यांची माहीती

 


चंदगड / प्रतिनिधी

      काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्य शासनाने दि. ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या काजू बी साठी प्रती किलो १० रूपये प्रमाणे अनुदान योजना घोषित केली आहे. यासाठी अर्ज करण्याची ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी हि अंतिम मुदत होती. उत्पादकांच्या मागणीनुसार ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढदिण्यात देण्यात आल्याचे काजू बोर्डाचे संचालक डॉ. परशराम पाटील यांनी सांगितले. 

     महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना उचित किंमत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू बी साठी प्रति किलो १० रूपये अनुदान लागू करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत अनुदान प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करण्यात आले होते. काजू अनुदान योजने अंतर्गत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही उत्पादकांच्या मागणीनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासन अनुदान देणे, या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यु.एमएसएएमबी. कॉम या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment