दुरदर्शन या लोकप्रिय दुरचित्रवाणी वाहीनीवर कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये जागतिक कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांची मुलाखत घेतली जाणार आहे. भारतीय कृषी अर्थव्यवस्था समस्या आणि उपाय या विषयावर हि मुलाखत घेतली जाणार असून सोमनाथ माळी हे सुत्रसंचालन करणार आहेत. या मुलाखतीचे दुरदर्शन या वाहिनीवर शुक्रवारी (ता. १) सायंकाळी ६ वाजता व पुन: प्रसारण सोमवारी (ता. ४) रोजी सकाळी ६ वाजता होणार आहे. डॉ. परशराम पाटील हे मुळचे चंदगड तालुक्यातील गुडेवाडी गावचे सुपुत्र आहेत. या मुलाखतीतून सर्वांनाच कृषी अर्थव्यवस्थेतील समस्या व उपाययोजनाबाबत माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
चंदगड / प्रतिनिधी
No comments:
Post a Comment