जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारीमुळे मानसिंग खोराटे यांना बळकटी - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2024

जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारीमुळे मानसिंग खोराटे यांना बळकटी

 


चंदगड (प्रतिनिधी) : 

        चंदगड मतदारसंघ हा एकेकाळी जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला म्हणून गणला गेला होता. पक्षाच्या स्थापनेनंतर विनय कोरे सावकर यांनी चंदगडवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच २००४ साली चंदगडचा आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आला. त्यामुळे या ठिकाणी जनसुराज्य पक्षाची पाळेमुळे घट्ट आहेत. त्याचाच फायदा २०२४च्या निवडणुकीत मानसिंग खोराटे यांच्या उमेदवारीला नक्कीच बळकटी मिळेल.  

      मानसिंग खोराटे यांनी अल्पावधीतच मतदारसंघात लोकप्रियता मिळवली आहे. त्यांचा झांजवत पाहता सर्व स्तरातील लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यातून त्यांनी सुरुवातीपासूनच अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्या दृष्टीने रणनीती आखून प्रचार यंत्रणा देखील राबविली. जन आशीर्वाद यात्रेतून जवळपास तीनशे गावांमध्ये संपर्क दौरा काढला. प्रत्येक वाड्या-वस्त्यावर जावून लोकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. लोकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 

    अशात उमेदवारी अर्ज भरताना त्यांना विनय कोरे सावकर यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद मिळाली असून आता ते अधिकृतरित्या जनसुराज्यचे उमेदवार असणार आहेत. अपक्ष लढण्यापेक्षा एखाद्या पक्षाची ताकद पाठीशी असण्याचे अनेक फायदे आहेत. पक्षाची यंत्रणा, नेत्यांचं पाठबळ आणि ताकद मिळाल्याने नक्कीच मानसिंग खोराटे यांची बाजू बळकट झाली आहे. चंदगड मतदारसंघातील जनतेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातून कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


विजयाच्या रुपात आमचं सतित्व नक्की दिसेल : खोराटे 

     जनसुराज्य शक्ती पक्षाने उमेदवारी दिल्याने त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. आम्ही अपक्ष म्हणून तयारी केली होती, त्यात पक्षाची ताकद मिळाल्याने आमच्यात दहा हत्तींचे बळ संचारले आहे. आमचे नेते विनय कोरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू असा विश्वास यावेळी मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला. याबाबत पक्षाकडून सर्व्हे सुरू होता, त्यामध्ये माझं काम आणि जनसंपर्क याच्या जोरावरच मला ही उमेदवारी मिळाली आहे. आम्ही महायुतीचा भाग असलो तरी या उमेदवारीही यूतीचा संबंध नाही. आमचं स्वतंत्र अस्तित्व असून ते यावेळी विजयाच्या रूपाने नक्कीच दिसून येईल.

     विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायचा शेवताच्या क्षणी अचानक उमेदवारी जाहीर झाली. साखर उद्योगाच्या माध्यमातून कोरे सावकर यांच्याशी आधीपासूनच मैत्री होती. आता राजकारणाशी संबंध आल्याने त्यांनी माझा या विधानसभेसाठी विचार केला हे माझं भाग्य आहे. चंदगड मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचं नेटवर्क असून त्याला फक्त पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. सध्या माझ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मतदारसंघात प्रत्येक गावापर्यंत जाऊन पोहचलो आहे. त्यात आता जनसुराज्य पक्षांमुळे चिन्हांची अडचण संपली असून नारळाची बाग या चिन्हावर नक्कीच पुन्हा एकदा चंदगड मतदारसंघात जनसुराज्यचा गुलाल उधळला जाईल असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला.

      जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापुरात चार जागा लढवण्याचा निर्धार केला होता. त्यामध्ये चंदगडची जागा आग्रहाने आम्ही महायुतीकडून मागितली होती. याठिकाणी आमचा पूर्वी आमदार होता. त्यामुळे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे आम्ही आग्रही होतो, पण जागावाटपात ही जागा आम्हाला मिळू शकली नाही. तरीदेखील आम्ही मानसिंग खोराटे यांचे नेटवर्क आणि पक्षाची ताकद पाहता ही जागा लढवत आहोत. त्यामुळे मानसिंग खोराटे यांच्या रूपाने पुन्हा एकदा चंदगडमध्ये नारळाची बाग या चिन्हावर आमदार जनसुराज्यचा असेल असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे सावकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment