देवरवाडी : संघर्ष दादा युवा मंच व प्रज्ञावंत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरीब-गरजूंसोबत साजरी केली दिवाळी - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2024

देवरवाडी : संघर्ष दादा युवा मंच व प्रज्ञावंत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरीब-गरजूंसोबत साजरी केली दिवाळी

चंदगड / प्रतिनिधी

      पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे गोर-गरीब कुटुंबियांसोबत 'आपुलकीची दिवाळी' साजरी संघर्ष दादा युवा मंच देवरवडी व  प्रज्ञावंत बहुउद्देशीय संस्था देवरवाडी यांच्या मार्फत राबविण्यात आला. 

   वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून आपल्याकडे दिवाळी साजरी होते. परंपरेनुसार अधिष्ठानासह दिव्यांचा सण म्हणून दीपावलीला मोठे महत्व आहे. दिपावलीच्या मंगलमय आणि आनंददायी पर्वात घरोघरी उत्साह, सौख्य नांदत असते. प्रत्येक घरात यथाशक्ती दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी लाडू, चिवडा, चकली अशा दिवाळीच्या फराळाची मेजवानी असते. आपण दिवाळीच्या फराळाचा, मिठाईचा आस्वाद, आनंद घेत असताना, काही घरं मात्र गरिबीच्या अंधारात बुडालेली असतात. समाजातील एक वर्ग असा आहे. ज्यांना दोन वेळचे पोटभर अन्नही मिळत नाही. त्यामुळे दिवाळीचा फराळ त्यांच्या घरी बनतच नाही. अशा गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी आपुलकीची दिवाळी, हा उपक्रम आज संघर्ष दादा युवा मंच देवरवडी व प्रज्ञावंत बहुउद्देशीय संस्था देवरवाडी यांच्या मार्फत पाटणे फाटा येथे राबविला. त्यावेळी संघर्ष दादा युवा मंच प्रमुख संघर्ष प्रज्ञावंत, अमोल भोगण, विशाल करडे, प्रमोद भोगण, युवराज पाटील, सागर पाटील, वसंत भांदुर्गे, ओमकार पाटील, सुहास गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत आपुलकीची दिवाळी हा उपक्रम राबविण्यात आला.

    बुंदी लाडू, रवा लाडू, बेसन लाडू,  शंकरपाळी, बाकरवडी आणि सोनपापडी अशा पदार्थांची पिशवी समाजातील उपेक्षित घटकांना घरपोच दिली. अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण गोड वाटप करुन, दिवाळीचा स्नेह आणि आपुलकी वाढवूया, असे आवाहनही संघर्ष प्रज्ञावंत  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment