चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गावडे यांनी बुझवडे, कानूर खुर्द व पुद्रा येथील धनगरवाड्यावर भेट देऊन तेथील धनगरबांधवांशी आपुलकीने चौकशी करून कपडे, फराळ, साबण आदी जीवनोपयोगी साहित्य देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात कार्यरत असणारे, समाजशास्त्रविभाग प्रमुख, डॉ. गावडे यांनी गोरगरिबासाठी सामाजिक बांधिलकीतून यापूर्वीही अनेक कृतिशील उपक्रम राबवले आहेत. सामान्य व आर्थिक खडतर परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी प्राध्यापक ते यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. आपल्या संघर्षशील वाटचालीची जाणीव ठेवून त्यांनी या वर्षीही त्यांनी सामाजिक बांधिलकीतून एक दिवस धनगर बांधवांसाठी या अभिनव उपक्रमांतर्गत पुंद्रा, बुजवडे व कानूर खुर्द येथील कित्येक वर्ष जंगलात राहणाऱ्या, व मूलभूत सोयी सवलती पासून दुर्लक्षित असणाऱ्या धनगर कुटुंबांच्या समवेत त्यांनी दिवाळी सण साजरा केला. यावेळी त्यांनी जीवनोपयोगी वस्तू, फराळ, उत्तम दर्जाचे कपडे देऊन त्यांच्यासमवेत आनंद साजरा केला, या अनोख्या प्रसंगाने लहान बालचमुसह,आबाल वृद्ध व स्त्रिया आनंदित झाल्या., त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. अशा आनंदी प्रसंगी आठवणीने संवाद साधून भूमिका जाणून घेतल्याबद्दल डॉ. गावडे, संतोष तावडे, उदय भोसले मित्रपरिवार कोल्हापूर यांचे धनगर बांधवांनी अभिनंदन करून ऋण व्यक्त केले.
निसर्गाशी व प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जगणाऱ्या धनगर कुटुंबीयांच्या जिद्दींचे डॉ. गावडे यांनी कौतुक केले. लहान शाळकरी मुलांना शिक्षणाचे महत्त्व विशद केले, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, जंगल खोऱ्यामध्ये जिद्दीने व संघर्ष करून जगणाऱ्या धनगर बांधवांनी व स्त्रियांनी, आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच जिद्दीने स्वावलंबी व्हावे असे आवाहन करून त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी संतोष गावडे, उदय भोसले व मित्रपरिवार, कानूर विभागाचे वनपाल चंद्रकांत पावसकर, बाळू पवार व त्यांचा संपूर्ण स्टाफ, बयाजी वरक, विठोबा डोईफोडे, धोंडीबा येडगे, धोंडीबा शेळके उपस्थित होते.
No comments:
Post a Comment