म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा या स्पर्धेतील विजेती महिला
चंदगड / प्रतिनिधी
म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे नवरात्र उत्सव व दसरा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा - खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन सौ. अनुसया दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर भगिनींमध्ये सौ. श्रीमंता तानाजी पाटील, सौ. सुशिला रामचंद्र पाटील, जना दतू पाटील, अनुसया शिवाजी पाटील, आनंदी पांडूरंग पाटील, शांता कृष्णा पाटील आणि आंबाका मारुती पाटील यांचा समावेश होता.
स्पर्धेमध्ये सहभागी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये तळ्यात-मळ्यात, स्ट्रॉ खोप्यात घालण, फुगे फोडणे, चिमटे लावणे,केळी खाणे, ग्लास मनोरा करणे,फुगे पळवणे,, टिकली खेळ, आणि बिस्किट खाणे यांचा समावेश होता. प्रत्येक खेळाची विजेती म्हणून सौ. स्वाती शाहू पाटील, सौ. लता शिवाजी कोकीतकर, सौ. मेघा प्रमोद पाटील, सौ. संध्या महेश कांबळे, सौ. अनिता नागोजी पाटील, सौ. प्रगती सचिन पाटील, आणि सौ. शालन भैरू पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांमध्ये विजेतेपदाचा मान सौ. संध्या महेश कांबळे यांनी पटकावला, तर उपविजेतेपद सौ. अनिता नागोजी पाटील यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संजय साबळे सर आणि रवी पाटील सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. या उपक्रमाद्वारे महिलांना त्यांच्या विविध कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामर्थ्याचे, सहकार्याचे दर्शन घडले. खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा या उपक्रमाने महिलांच्या सन्मानाला नवा अर्थ मिळवून दिला आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले.
No comments:
Post a Comment