वडील दारू पीत असल्याच्या नैराश्येतून कार्वे येथे १७ वर्षीय तरूणाची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2024

वडील दारू पीत असल्याच्या नैराश्येतून कार्वे येथे १७ वर्षीय तरूणाची आत्महत्या

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      वडील दारू पीत असल्याच्या नैराश्येतून मजरे कार्वे, ता चंदगड येथे १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना काल दिनांक १३/१०/२०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. प्रयास पांडुरंग पाटील असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद मयताचा नातेवाईक राजेंद्र निंगाप्पा इंजल यांनी चंदगड पोलिसात दिली.

     याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी, घटनेतील मयत प्रयास याचे मनावर गेल्या काही दिवसांपासून आपले वडील दारू पीत असल्याबद्दलची निराशा पसरली होती.  या  नैराश्येतून घरी कोणी नसताना वरील दिवशी घरी कोणी नसताना घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी घालून घरातील हॉलमध्ये छताच्या हुक्काला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. वर्दीदार इंजल यांच्या वर्दीवरून चंदगड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील हे करत आहेत.

No comments:

Post a Comment