बुक्किहाळ बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते बाळेशी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2024

बुक्किहाळ बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते बाळेशी पाटील यांचे निधन

 

बाळेशी पाटील


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

    बुक्किहाळ बुद्रूक (ता. चंदगड) गावचे सामाजिक कार्यकर्ते बाळेशी इराप्पा पाटील यांचे हदय विकाराच्या धक्क्याने आज मंगळवार दि. २६/११/२०२४ रोजी दुपारी १.३० वाजता दुःखद निधन झाले.

  बुक्किहाळ बुद्रुक व खुर्द गावांच्या विकासाची त्यांना मोठी तळमळ होती. विकासापासून वंचित असलेली ही गावे नावारूपास आली पाहिजे यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न असायचे. याकामी त्यांना कै  कल्लाप्पाण्णा बिर्जे यांचे मार्गदर्शन लाभले होते.  बिर्जे अण्णांच्या पश्चात त्यांनी विकास कामांचा वसा हाती घेतला होता. बुक्कीहाळ बुद्रुक येथील लक्ष्मी दूध संस्थेचे ते चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a Comment