अनिल वाघमारे |
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेली डिजिटल मीडिया परिषद आगामी काळात आता जोमाने कामाला लागणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार आपण संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महत्वपूर्ण बैठका घेऊन डिजिटल मीडिया परिषदेच्या नवीन जिल्हा कार्यकारणी मजबूत करणार असल्याची घोषणा डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केली. ते बीड येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले महाराष्ट्र राज्यात मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्हा पत्रकार संघाशी आपण समन्वय साधून जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मिडिया परिषदेचे युनिट म्हणजेच नवीन जिल्हा कार्यकारिणी करण्याबाबत विशेष महत्त्व देऊन नियोजनबद्ध प्रक्रिया राबवणार आहोत. प्रत्येक जिल्हा स्तरावर बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या निवडी देखील जाहीर केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा पदाधिकारी यांनी नवीन निवडी संदर्भात सर्व माहिती तातडीने 9822548696 या वाटस अप नंबर वर मॅसेज करुन कळवावी. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नवीन युनिट तयार करण्यासाठी सोपं होणार आहे. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा पत्रकार संघानी याबाबत दक्षता घेऊन तातडीने माहिती कळवावी. असे आवाहनही यावेळी अनिल वाघमारे यांनी केले.
No comments:
Post a Comment