चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती दोडामार्ग तालुक्यात, नारळाची झाडे शेतीचे केले नुकसान शेतकरी चिंतेत - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2024

चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती दोडामार्ग तालुक्यात, नारळाची झाडे शेतीचे केले नुकसान शेतकरी चिंतेत

विजघर परिसरात धुमाकूळ घालणारा जंगली टस्कर 
दोडामार्ग : सी एल वृत्तसेवा  
   गेल्या काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग येथून चंदगड तालुक्यात मुक्त संचार करणाऱ्या टस्कर हत्तीचे पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री विजघर घाटीवडे येथे आगमन झाले. या ठिकाणी चार ते पाच शेतकरी बांधव यांची नारळ सुपारी केळी झाडांचे नुकसान केले. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडले आहेत. जंगली राजा टस्कर पुन्हा आलाय हे समजताच जिल्हा उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली  दोडामार्ग वन अधिकारी वनपाल यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा केला यावेळी शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी वन पथक तैनात करावे अशी मागणी केली. 
विजघर, घाटीवडे येथे टस्कर ने केलेले नारळी पोफळीच्या बागांचे नुकसान
       गेल्या आठवड्यात टस्कर तिलारीनर, कळसगादे, हेरे, खामदळे येथे आढळून आला होता. तो व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे हा टस्कर राजा हत्ती  घाटीवडे विजघर येथे माघारी परतणार याची खात्री होती. ती अखेर खरी ठरली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो  घाटीवडे विजघर येथे दाखल झाला. 
     घाटीवडे विजघर येथील शेतकरी ज्यांचे या अगोदर देखील कळपाने नुकसान केले ते शेतकरी विठ्ठल गवस, 
वासुदेव नारायण गवस, इतर शेतकरी यांच्या नारळ सुपारी, केळी झाडांचे नुकसान केले. मध्यरात्री हत्ती आला हे समजताच शेतकरी यांनी वन कर्मचारी कोनाळ याना फोन केला. यावेळी तातडीने शुमम वारके, अजित कोळेकर, विकास गवाळकर, तेजस गावडे, नितेश देसाई हत्ती कॅम्प मधिल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 
     शनिवारी सकाळी याची माहिती कोनाळ वनपाल किशोर जंगले यांनी वरिष्ठांना दिली. या नंतर दोडामार्ग वन परिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडळ, कोनाळ वनपाल किशोर जंगले यांनी उपवनसंरक्षक नव किशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक वैभव भोराटे, सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. या टस्कर पाठोपाठ इतर हत्तीही येण्याची शक्यता असल्याने उन्हाळी शेती करणारे शेतकरी चिंतेत पडले आहेत. 

No comments:

Post a Comment