कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) केंद्रांतर्गत शालेय सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या लहान गटातील विजेतेपद केंद्र शाळा कालकुंद्री तर वरिष्ठ गटातील विजेतेपद कागणी शाळेने पटकावले.
स्पर्धेतील विजेते व उपविजेते पुढील प्रमाणे 'वरिष्ठ गट' समूह गीत स्पर्धा- प्रथम विद्या मंदिर कागणी, द्वितीय विद्यामंदिर कौलगे, समूह नृत्य स्पर्धा- प्रथम- विद्यामंदिर कागणी, द्वितीय- विद्या मंदिर होसूर, नाट्यीकरण स्पर्धा प्रथम- विद्यामंदिर किटवाड, द्वितीय- विद्यामंदिर कौलगे, कथाकथन प्रथम- विद्यामंदिर कौलगे, द्वितीय- विद्यामंदिर किटवाड.
'कनिष्ठ गट' समूह गीत प्रथम- केंद्र शाळा कालकुंद्री, द्वितीय- विद्यामंदिर कौलगे, समूह नृत्य प्रथम- केंद्र शाळा कालकुंद्री, द्वितीय- विद्यामंदिर बुक्किहाळ बुद्रुक, नाट्यीकरण प्रथम- केंद्र शाळा कालकुंद्री, द्वितीय- विद्यामंदिर किटवाड, कथाकथन प्रथम- विद्यामंदिर किटवाड, द्वितीय- केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री.
कार्यक्रमाचे उद्घाटन कालकुंद्री तंटामुक्त कमिटी अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष मधुकर कोकितकर, ज्योतिबा पाटील, व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर, शरद जोशी, श्रीकांत कदम, सुभाष पाटील, आदींच्या उपस्थितीत तर बक्षीस वितरण सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रामराव पाटील, पांडुरंग कोकितकर, दिनकर पाटील भरमू पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत मुख्याध्यापक पुंडलिक गुरव यांनी केले. अध्यापिका कोमल शेटजी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment