चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंदगड मतदार संघातून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव सट्टूपा पाटील (भाऊ) यांनी तालुक्यातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी मतदार संघात आभार दौऱ्याचे आयोजन केले आहे.
आभार दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी तुर्केवाडी जिल्हा परिषद व माणगाव पंचायत समिती भागातील आभार दौरा व सकाळी ११ वाजता स्वराज्य मल्टीपर्पज हॉल कार्वे येथे, तर कोवाड जिल्हा परिषद मतदार संघ व कर्यात भागात आभार दौरा व सायंकाळी ४.०० वाजता कोवाड येथे आमदारांचा सत्कार सोहळा.गुरुवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी नूल, हलकर्णी, महागाव (ता. गडहिंग्लज) जिल्हा परिषद मतदार संघात आभार दौरा व दुपारी १२ वाजता नूल येथे नागरी सत्कार, त्यानंतर नेसरी जिल्हा परिषद आभार दौरा व सायंकाळी ६.०० वाजता साखरे मंगल कार्यालय नेसरी येथे सत्कार सोहळा.
शुक्रवार दिनांक १३/१२/२०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे क्रीडा महोत्सव उद्घाटन. दुपारी हेरे पंचायत समिती क्षेत्रात आभार दौरा व दुपारी १२.०० वाजता हेरे येथे नागरी सत्कार. तर वाटंगी (तालुका आजरा) जिल्हा परिषद मतदार संघात आभार दौरा व दुपारी २.०० वाजता वाटंगी येथे सत्कार सोहळा.
अशा प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन असून यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील नागरिक व मतदार बंधू भगिनींनी आपल्या नजीकच्या ठिकाणी असलेल्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment