चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रसंत युगपुरुष गाडगे बाबांनी स्वच्छतेबरोबरच बहुजन समाजातील लोकांच्या मनातील अज्ञानरूपी,अंधश्रद्धेची घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ केली, त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने त्यांचे कार्य थोर व अजरामर असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.जी.वाय. कांबळे यांनी व्यक्त केले.
ते चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते पी. डी.सरवदे होते
डॉ. कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, स्वच्छतेबरोबरच गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला सुसंस्कृत केले, तळागाळातील गोरगरीब लोकांच्या मनातील अज्ञान व अंधश्रद्धारुपी अंधकार दूर करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले, समाजातील सर्व तरुणांनी गाडगे बाबांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यानुसार आचरण करण्याचे आवाहनही डॉ. कांबळे यांनी यावेळी बोलताना केले.
अध्यक्ष भाषणात पी. डी.सरवदे यांनी गाडगे बाबांच्या योगदानाचे महत्त्व विशद करून त्यांच्या कार्याची महती सांगितली. यावेळी डॉ. जी वाय.कांबळे. पी.डी.सरवदे आदी मान्यवरांच्या हस्ते हे गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
आभार सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला महादेव कांबळे, अविनाश कांबळे, ज्ञानेश्वर गावडे, पुंडलिक कांबळे, विजय गणाचारी, कलाप्पा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment