![]() |
ॲबॅकस स्पर्धेमध्ये गुरव कॉम्प्युटरचे चमकलेले विद्यार्थी |
अडकूर : सी एल वृत्तसेवा
कोल्हापूर येथील प्रो ॲक्टिव्ह अबॅकस कॉम्पिटेशनमध्ये चंदगड येथील गुरव कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
या स्पर्धेत १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा ८ गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात गुरव कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या स्पर्धेत एकूण १५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेत गुरव कॉम्प्युटरच्या चंदगड, अडकूर, नेसरी या तीन शाखेतील निवडक १६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये तेजल दुष्यंत शिंदे इयत्ता तिसरी हिने ५ मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मोहम्मद उमर अझरुद्दीन वाटंगी नेसरी व राजवीर महेश माने चंदगड यांनी दुसरा क्रमांक पटकावला, तर समृद्धी सुधीर कालकुंद्री इयत्ता चौथी चंदगड हिने ५ मिनिटे १० सेकंदात १०० पैकी ९६ गुण घेत तिसरा क्रमांक पटकावला. याशिवाय प्रयाग प्रकाश मडक (चंदगड) इयत्ता चौथी व नुरेलहसन जुबेर वाटंगी इयत्ता तिसरी (नेसरी) यांनी चौथा क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांची जानेवारी महिन्यात कोल्हापूर येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना राम गुरव, महेश गुरव, अर्चना गुरव, प्रसाद कुंदेकर व वेणू चिलगोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. अबॅकस म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स. या माध्यमातून गुरव कॉम्प्युटर्सने मेंदूच्या सर्वांगिण विकासासाठी, मुलांच्या स्मरणशक्तीच्या तसेच एकाग्रतेच्या वाढीसाठी लहान वयातील मुलांना हा अभ्यासक्रम खूप उपयोगी आहे असे सांगितले.
No comments:
Post a Comment