![]() |
प्रातिनिधिक छायाचित्र |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील नरेवाडी गावचे हद्दीत वेंगुर्ला रोडवर ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने या धडकेत एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सव्वा सात च्या सुमारास घडली. गौस हसन शेख (वय 58, राहणार तांबुळवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर) असे जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव असून त्याला उपचारासाठी केएलई हॉस्पिटल बेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक 11 रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास गौस शेख हे आपली मोटरसायकल घेऊन बेळगाव वेंगुर्ला रोडने नरेवाडी गावचे हद्दीतून तांबुळवाडीकडे चालले होते. यावेळी ट्रॅक्टर व दुचाकी यामध्ये धडक झाल्याने मोटरसायकल स्वार खाली पडले. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा पाय गुडघ्यातून निकामी झाला.
तसेच हात फ्रॅक्चर तसेच डावा कान, उजव्या पायाला तसेच तोंड व कमरेला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून चंदगड पोलिसांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांचा समक्ष जबाब घेऊन अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125 (a) 125 (b), मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (1) ब प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment