चंदगड : सी एल वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) च्या वतीने दरवर्षी एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन चंदगड तालुका स्तरावरील शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा 'पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२५' ही स्पर्धा रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ पासून इंडॉल क्रीडांगण (बेळगाव वेंगुर्ला हायवे हिंडगाव फाटा नजीक) येथे सुरू आहे. हे सामने अर्थातच सुट्टीच्या दिवशी खेळवले जातात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शासकीय निमशासकीय व सहकार क्षेत्रातील दिग्गज संघातील थरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
या स्पर्धेतील पाचव्या व सहाव्या दिवशी म्हणजेच दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दिग्गज संघ एकमेकांशी भिडणार आहेत. शनिवार दि. १५ रोजी एकूण सहा सामने होणार असून ते अनुक्रमे वन विभाग विरुद्ध पीडब्ल्यूडी, महावितरण विरुद्ध एलआयसी, तहसील विरुद्ध पीडब्ल्यूडी, एसटी महामंडळ विरुद्ध आरोग्य विभाग, तहसील विरुद्ध वन विभाग, प्राध्यापक वॉरियर्स विरुद्ध एलआयसी असे असतील. तर रविवार दिनांक १६ रोजी अनुक्रमे महा-ई-सेवा विरुद्ध माध्यमिक शिक्षक, तहसील विरुद्ध नगरपंचायत, बँक व पतसंस्था विरुद्ध माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक वॉरियर्स विरुद्ध एचडीएफसी बँक, पत्रकार विरुद्ध माध्यमिक शिक्षक हे पाच सामने होतील सर्व सामन्यांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाचा आनंद लुटावा असे आवाहन चंदगड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. चंदगड पोलीस संघ आपल्या गटातील सर्व सामाने जिंकून यापूर्वीच दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.
No comments:
Post a Comment