मौजे कार्वे येथे दि १६ रोजी नाचू कीर्तनाचे रंगी 'विद्यार्थी हरिपाठ सोहळा' - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2025

मौजे कार्वे येथे दि १६ रोजी नाचू कीर्तनाचे रंगी 'विद्यार्थी हरिपाठ सोहळा'

चंदगड : सी एल वृत्तसेवा
       मौजे कारवे (तालुका चंदगड) येथील विठू माऊली संगीत कला मंच यांचे मार्फत चंदगड, बेळगाव व खानापूर तालुक्या सह सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी परिपाठ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य मल्टीपर्पज हॉल बेळगाव- वेंगुर्ला रोड मजरे कार्वे येथे दिनांक १६/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत मौजे कार्वे चे सरपंच ज्योतिबा आपके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कांदा बटाटे व्यापारी व्यंकू जैनू बोकडे यांच्या हस्ते होणार आहे.
       कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून धनाजी कृष्ण पाटील (अध्यक्ष शिक्षक समिती चंदगड) व प्रकाश बोकडे (केंद्रप्रमुख हलकर्णी) यांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जीवन पुंडलिक कलखांबकर (मौजे कार्वे) व ऋतुराज दीपक पाटील (मांडेदुर्ग) हे आहेत. यावेळी ह भ प विजय मटकर गुरुजी यांचा कलखांबकर परिवार यांच्या वतीने सन्मान होणार आहे. यावेळी राजेंद्र बोकडे, अमित गावडे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      परिपाठ कार्यक्रमासाठी प्रत्येक मंडळाला दोन अभंग व एक गवळण यासाठी पंधरा मिनिटे वेळ दिला जाणार आहे. चंदगड, बेळगाव खानापूर तालुक्यातील निमंत्रित सुमारे २० भजनी परिपाठ पथके यात सहभागी होणार आहेत. वारकरी, भाविक व संगीतप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तानाजी कृष्णा पाटील व सदानंद कांबळे (पेंटर) मौजे कार्वे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment