६० एकरावर वणवा १३ गवतगंज्या खाक, तीन लाखांचे नुकसान, सामाजिक वनीकरणची झाडे देखील जळाली, कोठे घडली घटना........... - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2025

६० एकरावर वणवा १३ गवतगंज्या खाक, तीन लाखांचे नुकसान, सामाजिक वनीकरणची झाडे देखील जळाली, कोठे घडली घटना...........

होसूर (ता. चंदगड) येथे वणव्यात आगीच्या भक्षस्थानी पडत असलेल्या करडाच्या गवतगंज्या 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

       होसूर (ता. चंदगड) येथे  दि १६ रोजी दुपारी लागलेल्या वणव्यात गावातील शेतकऱ्यांच्या १३ गवतगंज्या जळून राख झाल्या. अज्ञात समाजकंटक आणि लावलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्यासाठी कापून रचलेल्या करडाच्या गवतगंज जळून खाक झाल्या. तब्बल ६० एकर परिसराला या वणव्याने वेढले होते. यातील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली काजू, निलगिरी आदी झाडेही आगीच्या भक्षस्थानी पडली.

      कर्नाटक राज्यातील म्हाळेनट्टी व अतिवाड गावांच्या सीमेला लागून असलेल्या 'म्होरले माळ' व 'सरकारी काऊल' (गायरान) परिसरात ही आग दिनांक १६ रोजी दुपारी ११ च्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात याचे रूपांतर मोठ्या वणव्यात झाले. दुपारी ११ ते अडीच वाजेपर्यंत वणवा पेटत होता. वनव्याची बातमी कळताच ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. सुमारे ५० ग्रामस्थ वनवा विझवण्यासाठी झटत होते. त्यामुळे सुमारे पन्नास ट्रॅक्टर ट्रॉली इतके गवत गंज्या वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.

      जनावरांच्या साठी गेल्या महिन्यात कापून ठेवलेल्या धाकलू लक्ष्मण बाळेकुंद्री, कल्लाप्पा लक्ष्मण बाळेकुंद्री, रणजीत तानाजी पाटील, टोपाणा शंकर बाळेकुंद्री, मारुती नागोजी पाटील, वैजनाथ नारायण पाटील, नारायण भरमू पाटील, गोपाळ जोतिबा बाळेकुंद्री, भागुबाई नारायण बाळेकुंद्री आदी शेतकऱ्यांच्या गवतगंज्या वनव्यात भस्मसात झाल्या यामुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment