![]() |
किणी, हुंदळेवाडी परिसरात आगीने उसाचे दहा एकर क्षेत्र भस्मासात केले. यावेळी लागलेल्या आगीचे भीषण दृश्य |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
किणी (ता.चंदगड) येथील तांबाळ नावाच्या शेतात शुक्रवार दि. ७ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग लगतच्या ऊस फडाला लागून भडकत गेली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. हुंदळेवाडी गावच्या ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्याने आग चारीबाजुना पसरून दहा एकर क्षेत्र जळून खाक झाले.आगीचे कारण अजून कळू शकले नाही.
कलमेश्वर जक्काप्पा बेळगावकर, गणपती जोतिबा बेळगावकर, संतोष रामचंद्र बेळगावकर, मारुती बाळू बामणे, बंडू रामचंद्र जाधव, वसंत कृष्णा जोशीलकर, आप्पाजी सिद्धापा पुजारी, सुलोचना मोदु पुजारी, बाळकृष्ण गणाचारी, पुंडलिक दत्तू बिर्जे, आप्पाजी रामा पुजारी, दुंडाप्पा पुजारी आदी शेतकऱ्यांचे दहा एकर क्षेत्रातील पिक जळाले.
जळलेला ऊस कारखान्यांनी तात्काळ करावा. अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच कारखान्यांनी गळीतासाठी नेलेल्या ऊसाची कपात करू नये अशीही मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment