कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
आगसगे (ता. बेळगांव) येथे सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नुकताच समारंभ पूर्वक निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले के. के. पी. सी. अध्यक्ष मलगौडा पाटील यांनी शाळेतील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून नूतन शाळा इमारतीसाठी पालकमंत्री नामदार सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून ३ कोटी रुपयांची निधी मंजूर केला असून इमारतीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिबा घेवडी तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एस. एल. तांदळे होते. यावेळी आगासगे गावचे सरपंच अमृत मद्देनावर, सदस्य अप्प्याया गौड पाटील, गुंडू कुरेनावर, निंगवा पाटील, रमेश पाटील, केंद्र प्रमुख सौ. शोभा बंदकनवर, प्राथमिक शिक्षक संघ उपाध्यक्ष शिवपुत्र मैत्री, संतोष मैत्री, चिंतामणी मैत्री, सुधीर चौगुले, भरमा पाटील, राजू घेवडी, महेश रेडेकर, इरापा चलवेटकर, आरती केदार, नकुशा कग्राळकर, शंकर मेनसे, दीपा मेनसे, कन्नड शाळेच्या मुख्याधपिका सौ. गंगा बंदकंन्नवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याधापिका सौ. मालती कांबळे यांनी केले. के. एल. पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment