चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघ दोन्ही गटामध्ये तडजोड करावी. यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे निवडणूक लागली. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये १५ जागा पैकी १४ जागावर यश मिळवून शिक्षक संघ थोरात गट प्रणित श्री राजश्री शाहू परिवर्तन स्वाभिमानी आघाडीने भरघोस संपादन केले. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या चंदगड वैजनाथ शिक्षक पतसंस्थेवर शिक्षक संघ थोरात गटाचे वर्चस्व राहिले.
या निवडीबद्दल पॅनल प्रमुख म्हणून बागीलागेचे काकपुतणे, सदानंद पाटील आणि शाहू पाटील या जोडीने बजावलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील, शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी नवनिर्वाचित संचालक आणि शिक्षक संघाचे (थोरात गटाचे) सर्व शिलेदार उपस्थित होते....!
No comments:
Post a Comment