सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रु. मुद्रांक शुल्क माफ, मंत्रीमंडळाचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2025

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रु. मुद्रांक शुल्क माफ, मंत्रीमंडळाचा निर्णय

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

       राज्यातील लाखो विद्यार्थी व सामान्य नागरिकांना प्रतिज्ञापत्रासाठी  लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ मग बजावणी सुरू करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत.

     या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कामासाठीच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क आता भरावे लागणार नाही.

    यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल. दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा खर्च वाचणार आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवले होते. तथापि आता हे शुल्क माफ करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश मी महसूल खात्याच्या वतीने प्रशासनाला दिले आहेत.

No comments:

Post a Comment