चंदगड तालुक्यातील सौरभ चौगुले ची 'रिझर्व बँक ऑफ इंडिया' मुंबई येथे निवड - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2025

चंदगड तालुक्यातील सौरभ चौगुले ची 'रिझर्व बँक ऑफ इंडिया' मुंबई येथे निवड

सौरभ एकनाथ चौगुले

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   चंदगड तालुक्यातील दुर्गम व अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीही विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत 'हम भी कुछ कम नही' हे अनेक वेळा दाखवून दिले आहे. त्यात नुकतीच आणखी एका विद्यार्थ्यांची भर पडली आहे. चंदगड तालुक्यातील भोगोली नजीक असलेल्या काळगोंडवाडी सारख्या दुर्गम गावचा सुपुत्र सौरभ एकनाथ चौगुले याची रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मुंबई विभागात नुकतीच निवड झाली आहे. यावरून चंदगड तालुक्यात टॅलेंट ठासून भरले आहे. फक्त त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे याची प्रचिती सौरभच्या निवडीने पुन्हा एकदा आली आहे.
    एकनाथ बाळू चौगुले (काळगोंडवाडी) हे नोकरी व्यवसायानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपला मुलगा सौरभ याला कोल्हापूर पब्लिक स्कूल कोल्हापूर (CBCE) मध्ये दाखल झाले केले. तेथे पहिली ते दहावी शिक्षण घेतल्यानंतर सौरभने संजय घोडावत कॉलेज अतिग्रे येथे अकरावी बारावी पूर्ण केले. त्यानंतर बी टेक (मेकॅनिकल) एमआयटी कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. शाळा कॉलेजात सुरुवातीपासूनच तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी त्याने बारा ठिकाण फॉर्म भरला उल्लेखनीय म्हणजे या बाराही ठिकाणावरून त्याला निवडीचे कॉल आले. रिझर्व बँक ऑफ इंडियाची निवड करण्यापूर्वी त्याला IDBI, RRB, STATE BANK OF INDIA, BANK OF INDIA, NEW INDIA ASSURANCE, UNITED INDIA INSURANCE आदी 12 कंपन्यांमध्ये असिस्टंट, ज्युनिअर असिस्टंट, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर अशा पदांवर संधी मिळाली होती. तथापि त्याने ते नाकारत RBI ची निवड केली. त्याला या कामी वडील एकनाथ चौगुले व आई सविता चौगुले व कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले. या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment