मौजे जट्टेवाडी येथे ९ ते ११ मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2025

मौजे जट्टेवाडी येथे ९ ते ११ मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

           मौजे जट्टेवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे रविवार दि. ९ ते ११ /०३/२०२५ अखेर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे यंदा २१ वे वर्ष असून सौ व श्री जक्कापा भावकू कोकितकर व आप्पाजी जक्काना पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ सत्यनारायण महापूजा व पांढरीदेवीच्या अभिषेकाने सोहळ्याची सुरुवात होईल. ९ रोजी  उमेश पावसे यांचे प्रवचन व हभप  आत्माराम महाराज कुटे शास्त्री (देवाची आळंदी) यांचे किर्तन, १० रोजी हभप. दत्ता पाटील (तवंदी शेकीनहोसूर) यांचे प्रवर्चन व हभप. शुभम महाराज शितोळे- सोलापूरकर (आळंदी देवाची) यांचे कीर्तन तर मंगळवार दि. ११ रोजी सकाळी हभप डॉ विश्वनाथ पाटील महाराज यांचे कालाकीर्तन, नंतर दिंडी सोहळा मिरवणूक व दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार आहे. भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment