![]() |
कु. मिताली सदानंद गावडे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमावर आधारित ऋणानुबंध प्रज्ञाशोध परीक्षा नुकत्याच पार पडल्या होत्या. या परीक्षेत चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या परीक्षेत प्राथमिक शाळा नागनवाडी (ता चंदगड) येथे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या कु. मिताली सदानंद गावडे (नागनवाडी) या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला वर्गशिक्षिका सानिया पठाण, मुख्याध्यापक संजय घोळसे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिला पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment