कार्वेच्या जान्हवी बोकडेची 'महाराष्ट्र महिला क्रिकेट लीग' साठी राष्ट्रीय खेळाडू स्मृती मानधनाच्या संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2025

कार्वेच्या जान्हवी बोकडेची 'महाराष्ट्र महिला क्रिकेट लीग' साठी राष्ट्रीय खेळाडू स्मृती मानधनाच्या संघात निवड

जान्हवी राकेश बोकडे

चंदगड : सी एल वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथील जान्हवी राकेश बोकडे हीची महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियम लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशा प्रकारच्या स्पर्धेत निवड झालेली ती चंदगड सारख्या ग्रामीण तालुक्यातील पहिलीच मुलगी ठरली आहे. सध्या ती पुणे येथे क्रिकेट अकादमीत सराव कर आहे.

   महाराष्ट्रामध्ये यंदा प्रथमच महाराष्ट्र महिला क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी पुणे येथील डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या संघ निवडीच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींनी सहभाग घेतला होता. या लिलावात जान्हवीची वयाच्या केवळ १३ व्या वर्षीच एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये निवड झाल्याने चंदगड तालुक्यासाठी हा मोठा बहुमान ठरला आहे. सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी, खेळतील कौशल्य, चिकाटीच्या जोरावर इतक्या कमी वयातही तिने निवडकर त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या टीममध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तिला स्थान मिळाले आहे. जान्हवी एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज व फलंदाज म्हणून  आपली कामगिरी पार पाडील. तिच्या यशामध्ये तिचें आई-वडील राकेश व पुष्पा तसेच तिचे काका राजेश व काकी राधा यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ क्रिकेटच्या सरावासाठी ती गेली दोन वर्षे आपल्या गावापासून ४०० किमी दूर पुणे येथे जिद्दीने कठोर परिश्रम करीत आहे. त्याचेच फळ  या निवडीमुळे तिला मिळाले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment