![]() |
चंदगड : सांस्कृतिक सभागृह लोकार्पण सोहळ्यात सहभागी माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, ह भ प पुंडलिक महाराज, मनोहर झेंडे जनार्दन गावडे, विठ्ठल गावडे, सुनील झेंडे आदी मान्यवर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात काही वर्षांपूर्वीच्या मामा भाचे यांच्या राजकारणाला खूप मोठा इतिहास आहे. सध्या तालुक्यात अवैध धंदे वाढत आहेत. सर्वसामान्य लोकांना हे नको आहे, तसेच या पुढील काळात गोपाळराव पाटील यांनी आम्हाला साथ द्यावी, अशी अपेक्षाही माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले असलेल्या सडेगुडवळे (ता. चंदगड ) येथील शनिवारी श्रीराम सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जिल्हा परिषद निधीतून 20 लाख रुपयांचा निधी खर्च करून सदर सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी दौलत चे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपसरपंच अस्मिता फाटक,
सरपंच प्रभावती गावडे, कानूरचे उपसरपंच अंबादास पाटील, ह भ प पुंडलिक महाराज, सेवा सोसायटीचे संचालक मनोहर झेंडे, जनार्दन गावडे, रत्नदीप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल गावडे, ग्रामस्थ, महिला मंडळ मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गोपाळराव पाटील म्हणाले, माझी कर्मभूमी सडेगुडवळेच आहे. या भागात मी खूप वर्षापासून आम्ही शेती करत आलो आहे. त्यामुळे या भागाचा मला चांगला अनुभव आहे. या भागाच्या विकासासाठी शासनाकडे नेहमी पाठपुरावा करत राहीन.
सूत्रसंचालन सुनील झेंडे यांनी केले. आभार नारायण गावडे यांनी केले.
No comments:
Post a Comment