![]() |
गोपाळ भुजंग डांगे |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
अलबादेवी (ता. चंदगड) येथील रहिवासी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भुजंग डांगे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी टक्कर देत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतः ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. निराधार, विधवा, अपंग यांना शासकीय योजनाचां लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या जाण्याने चंदगड तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होणार असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment